श्री. मिलिंद पावसकर
कोकणचा “स्वामी” भगवान परशुराम आणि अक्षयतृतीया (अक्षयतृतीया : ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही ती) यांत साध्यर्म्य आहे. याच अक्षयतृतीयेला सन 1988 साली (19 एप्रिल) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पाली गावी लिंगायत तेली समाजाच्या नाथपंथी “पावसकर” घराण्यात आमचा जन्म झाला. घरातल्या जवळपास आम्हास ज्ञात असलेल्या पणजोबा दामुशेठ, आजोबा मुरारी आणि वडील वासुदेव या सर्व पिढीच्या प्रतिनिधींना भारतीय संस्कृतीचा गाभाभूत घटक असलेल्या “ज्योतिष” या शास्त्राचे बव्हंशी ज्ञान होते. घरातला हा पिढीजात वारसा आम्हाला, आमच्या जन्माबरोबरच मिळाला आणि आई-वडील-गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो पुढे स्वकर्तृत्वाने वाढवला, फुलविला आणि आज बहरविण्याचा प्रामाणिक यशस्वी प्रयत्न करतो आहोत.
आमच्या अगोदरच्या पिढीचे प्रतिनिधी पणजोबा दामुशेठ यांचा जैतापुर, तालुका राजापूर (आगामी काळात होऊ घातलेल्या ९,९०० मेगावॉट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचे गाव) मुक्कामी तेलाचा घाणा आणि शेतीचा मुख्य व्यवसाय होता. आजोबा मुरारी यांनी तेलाच्या घाण्याचा व्यवसाय पुढे चालवला. तर वडील वासुदेव हे “देवी” रोगाचे सरकारी वैद्यकीय अधिकारी बनले आणि आमचा मुक्काम पालीला हलला, आमचे मातुल घराणेही तिथलेच बनले. पणजोबा-आजोबा हे विविध, सांस्कृतिक मंत्रविद्येत पारंगत होते. या विद्येचा खुबीने वापर करून सामान्यांच्या समस्या सोडवण्यात त्यांचा हातखंडा राहिला. वडिलांनी मात्र ज्योतिष, पत्रिका आणि जमिनीखालील शास्त्रावर मेहनत घेऊन कार्य केले, अनेकांचे प्रश्न मोकळे करून दिले.
या सर्व पार्श्वभूमीवर वयाच्या साडेपाच वर्षापासून आमच्या शास्त्रीय जडणघडणीस प्रारंभ झाला, असे आम्ही मानतो. मोठ्या बहिणीच्या पाठीवर वडिलांच्या 12 वर्षांच्या श्रीनवनाथसेवा फलित स्वरुप आमचा जन्म झाला, असे घरातले सांगतात. आमचे अगदी 12 वी पर्यंतचे शिक्षणही पालीतच झाले. “कमवा शिका योजना” चे संस्कार आमच्या मनावर कधी व कसे कोरले गेले माहीत नाही, पण इयत्ता सातवीत असतानाच हौस म्हणून आम्ही अगरबत्ती विक्रीचे, कुरियर सेवेचे काम काही काळ केले. अर्थात एका बाजूने घरात ज्योतिषाचा अभ्यास सुरुच होता. शासनाकडून आम्ही अगरबत्ती निर्मिती उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. दहावीनंतर मात्र, वडिलांचे बोट धरून ज्योतिष या विषयात मनासारखे “वेगळे” काम करायला प्रारंभ केला.
सन 2009 साली बृहनमहाराष्ट्र ज्योतिष अभ्यास मंडळाचा अभ्यासक्रम आणि स्वतंत्रपणे ज्योतिष पत्रिका पाहणी, मार्गदर्शन, विविध समस्या-समाधान आदी कार्य सुरू केले. यंदाच्या वर्षी सन 2015 ला यातील डॉक्टरेट प्राप्त झाली. सन 2010 साली वास्तूशास्त्र, 2011 साली रत्नशास्त्राचा अभ्यास सुरू केला. वास्तूशास्त्राचा अभ्यास हा भारतीय संस्कृतीत मूळ मानल्या गेलेल्या मैमतम, मनसारा, मनुष्यलयचंद्रिका, विश्वकर्माप्रकाश, धर्मसिन्धु, स्कंदपुराण, विष्णूपुराण, गणेशपुराण, नारदपुराण, अपराजितप्रूच्छ यातून पूर्ण केला. या दरम्यान जवळपास दीड वर्षे कोलकाता येथील कालिमाता मंदिर, अजमेर दर्गा, पुष्कर येथील ब्रम्हदेव मंदिर परिसरात संपूर्ण धार्मिक शिक्षणाचे धडे गिरवले. आजही आमचे वास्तू आणि ज्योतिष या विषयातील शिक्षण सुरुच आहे. “समस्या आणि समाधान” यांची सांगड जुळत गेल्याने पाली आणि रत्नागिरी येथे स्वतंत्र कार्यरत होत कामाच्या व्यापाप्रमाणे विस्तार वाढवला. वाढवलेल्या विस्तारानुसार अधिकाधिक वेळ, पूर्वपरवानगीसह आपल्या भेटीस येणा-यांना देण्याचा निरंतर प्रामाणिक प्रयत्न सुरुच आहे.
ईश्वरीय संकेतानुसार आमचे संपूर्ण कार्य हे नाथसंप्रदाय आणि दत्तसंप्रदायकडून मिळालेल्या दृष्टांतानुसार पिढीजात विविध ज्ञानांची उकल साधून होत असल्याने त्यात विविधताही तितकीच आहे. येणा-या प्रत्येकाची मूळ पत्रिका असो वा नसो, बसल्याजागी तब्बल किमान सहा पिढ्या मागे जाऊन पिढीजात दोष शोधून खात्रीशीर उपाययोजना करण्याकडे आमचा कल राहिला आहे. आमची ही पद्धत म्हणजे शतप्रतिशत “दैवी आशीर्वाद” असून आजही, आजन्म आम्ही या स्वयंविकसित प्रणालीनेच येणा-यांचे शंकासमाधान करण्यावर विश्वासुन आहोत.
निव्वळ भक्कम पाठबळाच्या जोरावर, तेवढ्याच परिश्रमपुर्वक मेहनतीने आम्ही खूप कमी वेळेत आणि वयात स्वत:च्या विचार विकसनशिलतेची पद्धत विकसित करून ती अंमलात आणली आहे. यामुळेच आज आमच्याकडे भेटीस येणा-यांत देश विदेशातील व्यावसायिक, प्रथितयश राजकारणी आणि सिनेचित्रपट क्षेत्रातील विविध स्टार कलाकारांचा ओढा जरा जास्तच आहे. बोअरिंग अथवा विहिरीचे पाणी अचूक दाखवून ते लागेपर्यंत जागा न सोडण्याचा, आमचा आम्ही स्वत:ला दिलेला शब्द आजही पाळतो आहोत. आमच्या वापरात, पाहण्यात आजमितीस सुमारे सातशे प्रकारची रत्ने उपलब्ध आहेत. येणा-यांना रत्ने धारण करण्याबाबतचे ईत्यभूत ज्ञान आम्ही देतच असतो. गेली सात वर्षे याच विषयात आम्ही प्रामुख्याने लक्ष घालून आहोत.
येणा-या प्रत्येकाच्या मनात विचारांची वादळे घोगांवत असतात. ती वादळे शांत करून त्यातील वावटळ अलगद बाजूला करून समोरच्याला संपूर्ण समाधान देण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही ईश्वरीय संकेतानुसार करीत आहोत, करीत राहणार आहोत, हे नक्की !