भेटीस येणा-या प्रत्येकाला, सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून, वैज्ञानिक साधारासह विविध प्रश्नांची अध्यात्मिक मार्गातून उकल उपलब्ध करून देणारी “स्वामी मालिक” ही एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक संस्था आहे.
अध्यात्म हे आपल्या हृदयातून जन्म घेतं. पारदर्शक होणं, खोलवर आत जाणं, आपल्या भावना निरंतर विकसित होणं म्हणजे अध्यात्म होय. मोठे होण्यासाठी अध्यात्म आपल्याला खूप मदत करते. त्यासाठी प्रार्थनेची गरज असते. आपली प्रार्थना जर सक्षम असेंल तर आपलं जीवनही अध्यात्मिक, पारदर्शी होईल. आपले विचार आपली परिस्थिती कथन करत करतात. त्यामुळे आपण स्वत:शी आणि ईश्वराशी प्रामाणिक राहून आपल्या प्रत्येक विचाराला प्रार्थना बनवायला शिकायला हवे. कारण प्रार्थना दोन स्तरांवर काम करत असते. एक म्हणजे प्रार्थना करणा-या व्यक्तीला मनशांती मिळते आणि विश्वास निर्माण होतो कि समस्या सुटेल आणि खरोखरच समस्या सुटते . हा तुमच्या प्रार्थनेचा परिणाम असतो. प्रार्थनेमुळे मनोवृत्तीत बदल होतो आणि तुम्ही योग्य विचार करू लागता. योग्य विचारामुळे योग्य कृती घडते आणि योग्य परिणाम घडून येतात. यात संपूर्ण विज्ञान आहे. याची वेगळ्या प्रकारे आम्ही “स्वामी मालिक” मध्ये जाणीव करून देतो.
आध्यात्मिकता म्हणजेच मानवता होय. मानव जेव्हा आपल्यातील पशूतुल्य अथवा असुरी इच्छा व अभिलाषांच्या जोखडातून मुक्त होऊन मानवतेच्या उच्च शिखराकडे जेवढा जास्त येत जाईल आणि नैतिकता व मानवीय गुणधर्माच्या अलंकारांनी विभूषित होऊन ईशप्रसन्नतेचे अत्युच्च लक्ष्य गाठण्याचे जेवढे यशस्वी प्रयत्न करील तेवढा जास्त त्याचा आध्यात्मिक विकास होईल. एकीकडे बुध्दीच्या बळावर वैज्ञानिक क्षेत्रात मानवाने साधलेल्या अचाट प्रगतीचे चित्र दिसत असतानाच, दुसरीकडे भारतीय समाजात मात्र अध्यात्माच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रध्दा, बुवाबाजी दिसते. भारतीय समाजाची मानसिकता दर्शवणा-या या परस्पर विरोधी चित्रांमुळे ‘अध्यात्म’ आणि ‘विज्ञान’ यांच्यातील परस्पर संबंधाविषयी समाजाने पुन्हा नव्याने जाणून घेण्याची गरज आज निर्माण झाल्याचे जाणवते. ही गरज पूर्ण करण्यासाठी “स्वामी मालिक” कार्यरत आहे.